जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण; तर 11 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, August 19, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण; तर 11 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण; तर 11 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज 


एकाचा मृत्यू,  364 रुग्णांवर उपचार सुरु  

 

        हिंगोली,दि.19: जिल्ह्यात आज 7 नवीन कोविड-19 चे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसरातील 5 व्यक्ती, औंढा नागनाथ परिसर 2 व्यक्ती असे एकूण 7 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  तसेच आज 11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका 75 वर्षीय कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 9 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 2 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 11 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 194 रुग्ण झाले असून, त्यापैकी 816 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 14 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

Post Top Ad

-->