बुलडाणा,(जिमाका) दि.6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 472 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 402 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 70 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपिड टेस्टमधील 48 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 53 तर रॅपिड टेस्टमधील 349 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 402 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 1, बजरंग नगर 1, काँग्रेस नगर 1, जिल्हा न्यायालय 2, जुनागाव 2, सुंदरखेड 2, तानाजी नगर 1, केसापूर ता. बुलडाणा : 1, साखळी ता. बुलडाणा : 1, दत्तपूर ता. बुलडाणा : 1, मलकापूर : मंगल गेट 1, आनंद सोसायटी 1, नांदुरा : सिंधी कॅम्प 4, डवंगेपुरा 1, आठवडी बाजार 1, मिलींद नगर 2, वसाडी बु. ता. नांदुरा : 3, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2, चिखली : 1, शेगांव : सरकारी फैल 1, मोदी नगर 1, लखपती गल्ली 1, आयटीआय कॉलेजजवळ 1, लोणार : मापारी गल्ली 5, मोतमारा ता. मोताळा : 10, अंभोरा ता. दे.राजा :1, असोला ता. दे. राजा : 2, दे. राजा : 5, डिग्रस ता. दे. राजा : 13, खामगांव : शिवाजी नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 70 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज शिवाजी नगर खामगांव येथील 62 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 39 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मलकापूर : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1, नांदुरा : 2, राम मंदीराजवळ 1, डवंगेपुरा 1, विदर्भ चौक 1, खामगांव : देशमुख प्लॉट 1, सिंधी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, एकता नगर 1.
तसेच आजपर्यंत 11093 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 990 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 990आहे. आज रोजी 166 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 11093 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1687 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 990 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 662 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.