एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 46 जण नव्याने पॉझेटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, August 6, 2020

एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 46 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 5 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 82 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज (दि.6) एका कारोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 37 झाली आहे. तसेच गुरुवारी 46 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे.

गुरुवारी मृत झालेली महिला ही 58 वर्षीय असून पुसद शहरातील आहे. तर आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 46 जणांमध्ये 27 पुरुष आणि 19 महिला आहेत. यात दारव्हा येथील अंबिका नगर येथील एक पुरुष, दिग्रस शहरातील पाटीपुरा येथील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन महिला, पांढरकवडा शहरातील न.प. आखाडा वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील अर्ली येथील पाच महिला व एक पुरुष, पुसद तालुक्यातील पारडी येथील एक पुरुष व एक महिला, श्रीरामपूर येथील एक महिला, पुसद शहरातील राजे ले-आऊट येथील एक महिला, आंबेडकर वॉर्ड येथील एक पुरुष, वसंत नगर येथील एक पुरुष, तसेच पुसद शहरातील एक महिला व दोन पुरुष, यवतमाळ शहरातील दोन महिला व एक पुरुष, लोखंडी पुल येथील एक पुरुष, तेलीपुरा येथील दोन पुरुष, गोदाम फैल येथील एक महिला, शास्त्री नगर येथील एक पुरुष, कुंभारपूरा येथील एक पुरुष, नेर शहरातील वॉर्ड क्रमांक 1 येथील एक पुरुष, नेर शहरातील एक महिला व दोन पुरुष, नेर तालुक्यातील घारफळ येथील चार पुरुष व दोन महिला, महागाव शहरातील एक पुरुष, उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथील दोन पुरुष व एक महिला, ढाणकी येथील एक पुरुष व एक महिला, 
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 323 ऐवढी आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1356 झाली आहे. यापैकी 994 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 37 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 125 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 63 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 23050 नमुने पाठविले असून यापैकी 19050 प्राप्त तर 4000 अप्राप्त आहेत. तसेच 17694 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Post Top Ad

-->