बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 526 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 445 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 81 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 59 व रॅपिड टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 121 तर रॅपिड टेस्टमधील 324 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 445 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :मलकापूर : 5, चिखली : 4, नांदुरा : 2, शेगांव : 1, पटवारी कॉलनी 3, गांधी चौक 1, ब्राम्हणपूरा 2, माळीपूरा 1, ओम नगर 3, भैरव चौक 2, लखपती गल्ली 2, खामगांव : 2, आठवडी बाजार 4, केशव नगर 2, सुटाळा 4, रेणुका माता नगर 1, शिवाजी वेस 5, बाळापूर फैल 2, जुना फैल 2, शंकर नगर 1, रॅलीस प्लॉट 1, जोशी नगर 1, पोलीस वसाहत 2, सती फैल 1, तलाव रोड 2, अमडापूर ता. चिखली 1, नेपाणा ता. खामगांव : 1, धाड ता. बुलडाणा : सराफा लाईन 2, बुलडाणा : 2, जिल्हा सामान्य रूग्णालय 1, दे.राजा : 1, खळेगांव ता. लोणार : 1, सुलतानपूर ता. लोणार : 4, सि. राजा : 1, मेहकर : 6, जानेफळ ता. मेहकर : 1, घाटबोरी ता. मेहकर : 1, भेंडवळ ता. जळगांव जामोद : 1,डोंगरशेवली ता. चिखली : 1, मूळ पत्ता नागपूर असलेले : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 81 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 29 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मेहकर : रामनगर 1, शिवाजी नगर 1, लोणी गवळी ता. मेहकर : 10, डोणगांव ता. मेहकर : 7, लोणार : 4, खामगांव : आठवडी बाजार 4, केशव नगर 2.
तसेच आजपर्यंत 11538 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1019 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1019 आहे.
आज रोजी 202 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 11538 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1768 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1019 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 714 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे