शेतकऱ्यांनी शेताच्या नुकसानाची माहिती कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यावी
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : माहे 10 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्ट 2020 या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी जादा पाऊस झालेला आहे. या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचून पिकांचे नकसान झाले आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खरडून देखील गेली आहे. याच बरोबरीने धरणातील पाण्याचा साठा पुर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडले गेले. त्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्येसुद्धा पाणी जावून पिकांचे नुकसान किंवा जमीन खरडून गेली असणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाच्या किंवा जमीन खरडून गेल्याचा नुकसानीची माहिती आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे द्यावी, असे आवाहन पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी क्रॉप इन्शुरन्स अप्लीकेशन या मोबाईल ॲपद्वारे आपले नुकसान नोंदवावे. याकरिता ‘गुगल प्ले स्टेअर’ वर जावून वरील ॲप डाऊनलोड करावे. सदर ॲप डाऊनलोड करणे शक्य न झाल्यास कृषी सहाय्यक यांचेकडे नुकसान झाल्यापासून 72 तासात देण्यात यावा, असे आवाहनही पालकमंत्री ना. राजेंद्रजी शिंगणे यांनी केले आहे.