194 नव्याने पॉझेटिव्ह
यवतमाळ, दि. 29 : गत 24 तासात जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 194 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, वणी शहरातील 70 वर्षीय महिला, पुसद येथील 64 वर्षीय पुरुष, महागाव शहरातील 30 वर्षीय पुरुष, बाभुळगाव शहरातील 65 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 63 वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 194 जणांमध्ये 127 पुरुष व 67 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 49 पुरुष व 21 महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील 28 पुरुष व 15 महिला, पांढरकवडा तालुक्यातील दोन पुरुष, पुसद शहरातील 18 पुरुष व नऊ महिला, आर्णी शहरातील सात पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, महागाव तालुक्यातील तीन पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील चार पुरुष व पाच महिला, वणी तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात 228 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8470 झाली आहे. यापैकी कालपर्यंत 6966 जण बरे झाले होते. आज बरे होऊन सुट्टी देणा-यांची संख्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही, असे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या 262 झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 275 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 74713 नमुने पाठविले असून यापैकी 73690 प्राप्त तर 1023 अप्राप्त आहेत. तसेच 65220 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.