जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धडक मोहिम - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, September 29, 2020

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धडक मोहिम


‘नो मास्क, नो सर्व्हीस’ मोहिमेअंतर्गत 272 जणांवर कार्यवाही

अकोला,दि. 29 (जिमाका)- ‘नो मास्क, नो सर्व्हीस’ या मोहिमेची सुरुवात मंगळवार(दि.29) पासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी धडक मोहिम राबवून केली. आज शहरातील प्रमुख बाजारपेठेत स्वत: भेट देवून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करुन आवाहन केले. यावेळी त्याच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हे होते.
‘नो मास्क, नो सर्व्हीस’ या मोहिमेचे शुभारंभ करुन मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे सेवा दिल्या जाणार नाही. ही मोहिम जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर मोठया प्रमाणात राबविली जात आहे. या मोहिमेसोबतच नो मास्क नो मेडीसीन, नो मास्क नो धान्य, नो मास्क नो सेल या प्रकारच्या मोहिम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक स्वरुपात प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये कोविड-19 या विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. याला अटकाव घालण्याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजना अंतर्गत आज जिल्हाधिकारी यांनी ‘नो मास्क, नो सेवा’ या मोहिमेची शुभारंभ करुन बाजारपेठेतील दुकाने, हातगाडी व बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना भेट देवून मास्क लावण्याबाबत आवाहन केले. तसेच मास्क न लावणाऱ्या दुकानदार व बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करुन 272 व्यक्तीकडून 54 हजार 400 रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. तसेच बाजारपेठीतील धडक मोहिमे दरम्यान मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांना गुलाब भेट देवून दुसऱ्यांना मास्क लावण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

Post Top Ad

-->