आत्मनिर्भर अभियानाची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांची उद्दीष्टपूर्ती करावी - खासदार प्रतापराव जाधव - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 4, 2020

आत्मनिर्भर अभियानाची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांची उद्दीष्टपूर्ती करावी - खासदार प्रतापराव जाधव




विविध प्रलंबीत योजनांच्या कामांची आढावा बैठक

कोविड केअर सेंटरमध्ये चांगल्या सुविधा द्याव्यात

शासनाकडून प्राप्त कुठलीही मदत कर्ज खात्यात टाकू नये

पोषण आहाराचे प्रमाण व दर्जा वेळोवेळी तपासावा  

बुलडाणा,(जिमाका) दि.4:  कोरोना विषाणू संसर्ग परिस्थीतीमुळे समाजातील प्रत्येक घटक व्यथित आहे. सर्व क्षेत्रामध्ये निराशा आलेली आहे.  रस्त्यावर फिरती विक्री करणारे विक्रेते यांना तर कोरोनाची चांगलीच झळ बसली आहे. या सर्व घटकांना आत्मनिर्भर  बनविण्यासाठी  तसेच त्यांना  अशा बिक्ट आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासन आत्मनिर्भर अभियान राबवित आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे, असे निर्देश खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिले.

    स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात प्रलंबीत योजनांमधील कामांच्या बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार डॉ. संजय रायमूलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदी उपस्थीत होते. तसेच बैठकीला संबधीत  विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.  

   कापूस, मका खरेदीचा आढावा घेताना खासदार श्री. जाधव म्हणाले, नोंदणी केलल्या शेतकऱ्यांचा मका व कापूस खरेदी करायचा रहीला असेल, तर  तो खरेदी करावा. कापूस  शिल्लक असलेल्या  शेतकऱ्यांची माहीती घेवून तो खरेदी करावा. आत्मनिर्भर अभियानाचा लाभ देण्यासाठी संबधीत यंत्रणेने बँकांच्या तालुका निहाय बैठका घ्याव्यात. बँकांनी मानवतेच्या दृष्टीने बघून लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून आर्थिक लाभ द्यावा.  कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. त्यांना पाणी, भोजन, नाश्ताची व्यवस्था करावी. कुणाहीची तक्रार याबाबत यायला नको. कोरोना बाधीत रूग्णांना आता गृह अलगीकरणात ठेवण्यात येते. याबाबत त्यांना कुठेही संपर्क न करण्याचे, घरातच राहण्याबाबत समजावून सांगावे. प्राथमिक गरजा भागविल्या जातील अशा जम्बो कोवीड हॉस्पीटल निर्मितीबाबत कारवाई करावी.   

    पिक विमा कंपनीने विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेवून निकाली काढण्याचे सूचित करीत खासदार म्हणाले, यावर्षीच्या नुकसानीची सहानुभूतीने सर्वे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा. पीएम किसान योजनेत नोंदणी राहीलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी. एका महीन्यात हे काम पूर्ण करावे. स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कुटूंबप्रमुखांएवजी एका सदस्यालाही आता लाभ मिळतो. याबाबत मागील एका वर्षाच्या काला वधितील सादर प्रकरणे तपासून कुंटूंबातील सदस्य लाभास पात्र असेल, तर लाभ द्यावा. याबाबत कृषी सेवक, सहाय्यक यांनी गावात जावून जनजागृती करावी. शेतकऱ्यांना या बदलाची माहीती द्यावी. याचा बुलडाणा पॅटर्न राबवावा.

   ते पुढे म्हणाले, बँकांनी त्यांच्याकडील वन टाईम सेटलमेंट योजनांची प्रसिद्धी करावी. जुने थकीत खातेदार शेतकऱ्यांकडून ओटीएस ची मुद्दलाची योजनेप्रमाणे 70 टक्के पर्यंत असणारी रक्कम भरून शेतकऱ्यांचे उर्वरीत कर्ज माफ करावे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. तसेच शासनाने दिलेली कुठलीही मदत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती करू नये. अशा बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात.  महीला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांमधून दिला जाणारा पोषण आहाराचा दर्जा  तपासून घ्यावा. सदर आहाराचे वितरण शासनाच्या नियमाप्रमाणे परिमाणात होत आहे किंवा नाही, याबाबतही भेटी देवून अहवाल घ्यावा.  कमी पुरवठा असल्यास संबंधीत कंत्राटदारांकडून लाभार्थ्यांना वाटप करावा. त्याचप्रमाणे यावेळी समृद्धी महामार्ग, ग्रामिण रस्ते, दलित वस्ती सुधार योजना, मेहकर व लोणार नगर परिषदेकडील प्रलंबीत विषयांचाही आढावा घेण्यात आला. आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी मतदारसंघातील प्रलंबीत कामांचा आढावा घेतला व संबधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.  बैठकीला संबधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post Top Ad

-->