एमएचटी-सीईटी परिक्षेबाबत तयारी पूर्ण - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, September 29, 2020

एमएचटी-सीईटी परिक्षेबाबत तयारी पूर्ण

 उमेदवारांनी कोरोना परिस्थितीत परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याचे प्रशासनाकडून आवाहन

*गडचिरोली,(जिमाका) दि.29 : राज्यासह जिल्हयात दि. 01 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन होणाऱ्या एमएचटी-सीईटी परिक्षेबाबत जिल्ह्यात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. टप्याटप्याने या कालावधीत वेळापत्रकानूसार परिक्षा घेणेत येणार असून उमेदवारांनी कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांची नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी परिक्षेबाबतची तयारी, प्रवास व्यवस्था, वेळेबाबतचे नियोजन, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर आढावा घेणेत आला. गडचिरोली जिल्ह्यात परिक्षा केंद्रावर 626 उमेदवार दि.01 ते 9 ऑक्टोबर पर्यंत तर जिल्ह्यातीलच परंतू नागपूर केंद्रावर परिक्षा देणारे 884 उमेदवार टप्प्या-टप्प्याने 1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान परिक्षा देणार आहेत. यामध्ये गडचिरोलीतील पॉलीटेक्नीक कॉलेजवर 330 व सायन्स कॉलेजवर 306 उमेदवार परिक्षा देणार आहेत.

नागपूरसाठी जाणाऱ्या उमेदवारांनी आगारात एक दिवस आधीच माहिती नोंदवावी : परिक्षेसाठी प्रशासनाकडून दररोज पहाटे 4 वा.च्या दरम्यान विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी किंवा माहिती एक दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. गाडीमध्ये आवश्यक संख्या पुर्ण होण्यासाठी याबाबतची नोंदणी आवश्यक आहे. परिक्षा केंद्रावर जिल्ह्यात तसेच नागपूर परिक्षा केंद्रावर 8.45 च्या अगोदर पोहचणे उमेदवारांसाठी बंधनकारक आहे. त्यामूळे आगाराकडून वेळेत एस.टी निघण्यासाठी अगोदर संपर्क करुन घेणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. पहाटे 4.00 वा च्या दरम्यान विशेष बसची व्यवस्था आहे. पंरतू याव्यतिरिक्त दुपारच्या सत्रासाठी जाणाऱ्या व एक दिवस अगोदर जाणाऱ्या उमेदवारांसाठी दिवसभरात नियोजित वेळेनूसार बसेस सूटणार आहेत. यात सकाळी 6.30 वा., 7.30 वा., 8.30 वा.,9.30 वा., 10.30 वा., दुपारी 12.30 वा.,1.30 वा., 2.30 वा., आणि 4.30 वा. एसटी नागपूरकडे जाणार आहेत. तसेच नागपूरहून गडचिरोलीसाठी दैनंदिन स्वरुपात तसेच परिक्षा कालावधीत सायंकाळी 6.00 वा., 7.00 वा., आणि शेवटची गाडी 8.00 वा. सूटणार आहे. उमेदवारांनी आवश्यक वेळापत्रकाबाबत व अधिकच्या माहितीबाबत आगारातील वाहतूक निरिक्षक अतूल रामटेके मोबाईल क्र. 9527572062 आणि वाहतूक नियंत्रक पवन वनकर यांचा मोबाईल क्रमांक 9011152062 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
उमेदवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. परिक्षा केंद्रावर परिक्षेसंबंधी साहित्य सोडून इतर कोणत्याही प्रकारचे साहित्य नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच सोबत मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Post Top Ad

-->