कोरोना अलर्ट : प्राप्त 703 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 78 पॉझिटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, December 6, 2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 703 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 78 पॉझिटिव्ह

बुलडाणा,(जिमाका) दि.6 64 रूग्णांना मिळाली सुट्टी: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 781 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 703 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 78 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 69 व रॅपीड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 635 तर रॅपिड टेस्टमधील 68 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 703 अहवाल निगेटीव्ह आहेत.

 पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 11, नांदुरा शहर : 6,  सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 8, पांगरखेड 3, जांभोरा 1, पिंपळखुटा 1, दे. राजा  तालुका : टेंभूर्णी 1, मेहुणा राजा 1, जवळखेड 1,   शेगांव शहर : 4, मोताळा तालुका: धा. बढे 3, खामगाव शहर: 6, दे. राजा शहर: 3,   बुलडाणा तालुका: कोलवड  1, हराळखेड 1, पांगरी 1,  चिखली तालुका: भरोसा 2,  चिखली शहर: 9, नांदुरा तालुका: अंबोडा 1, शेंबा बु. 2, जळगांव जामोद शहर: 1, सिं. राजा शहर: 9, मूळ पत्ता अंबरनाथ 1, अमरावती 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 78 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मलकापूर येथील 63 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

 तसेच आज 64 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव :  2, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 21, स्त्री रुग्णालय 3, अपंग विद्यालय 3,  दे.राजा :1,  सिं. राजा : 11,  चिखली : 1, जळगांव जामोद : 6, नांदुरा : 6,  मलकापूर: 9, मोताळा : 1.

तसेच आजपर्यंत 78371 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11119 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11119 आहे.  


 तसेच 1357 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 78371 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11570 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11119 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 313 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 138 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

Post Top Ad

-->