350 पॉझिटिव्ह .96 रूग्णांना मिळाली सुट्टी Buldhana covid-19 - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, February 22, 2021

350 पॉझिटिव्ह .96 रूग्णांना मिळाली सुट्टी Buldhana covid-19


बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1448 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1098 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 350 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 291 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 744 तर रॅपिड टेस्टमधील 354 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1098 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 21, खामगांव तालुका : माक्ता 1, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : वाडी 1, निमखेड 1, टाकरखेड 1, बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका : केसापूर 1, भादोला 1, तराडखेड 1, दहीद बु 1, माळवंडी 1, सागवन 5, सुंदरखेड 2,  गिरडा 2, टाकळी 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : थार 1, डोणगांव 2, जानेफळ 2, बऱ्हाई 2, कुंबेफळ 1, दे. राजा तालुका : अंढेरा 10, आळंद 2, सिनगांव जहागीर 18, भिवगण 8, दे. राजा शहर : 40, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : चिंचोली 1, पिंपळखुटा 2, दुसरबीड 1, चिखली शहर : 33, चिखली तालुका : टाकरखेड 1, अंचरवाडी 1, ईसोली 1, पिंपळवाडी 3, हातणी 3, वळती 1, अंत्री कोळी 4,   जांभोरा 3, गुंज 1, मंगरूळ नवघरे 5, केळवद 2, धोत्रा भणगोजी 2,  सवणा 3, पेठ 1, तेल्हारा 2, पिंपळगांव सोनाळा 2, मालखेड 1, गजरखेड 1, भोरसा भोरसी 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 1, लासुरा 2, जांबुळ धाबा 1, कुंड बु 2,  जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 5, मोताळा शहर : 7, मोताळा तालुका : तळणी 1,  लोणार तालुका : पिंपळनेर 1, हिरडव 1, लोणार शहर : 10,  मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव 1, मेरखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना 1, डोलखेडा जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 350 रूग्ण आढळले आहे.

तसेच आज 96 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 4, बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 2, अपंग विद्यालय 24, स्त्री रूग्णालय 3,  दे. राजा : 9, चिखली : 15, लोणार : 4, शेगांव : 17, जळगांव जामोद : 3, मलकापूर : 5, मेहकर : 9, नांदुरा : 1. तसेच आजपर्यंत 121529 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14686कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14686आहे.  आज रोजी 3330 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 121529 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16496 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14686 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1623 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Post Top Ad

-->