पुन्हा एकदा लॉक डाऊन दुकानांची वेळ आता सकाळी 9 ते संध्याकाळी 5
सर्वच प्रकारच्या शाळा बंद
खाजगी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती
मंदिरात एकाच वेळी केवळ 10 जणांना प्रवेश
विवाह सोहळ्यासाठी केवळ 25 लोकांना परवानगी
विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी (बुलडाणा सह) लॉक डाऊन जाहीर केला आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी सदर आदेशाला जिल्ह्यासाठी लागू केले असून आता सर्व दुकाने, आस्थापना यांची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी करण्यात आली आहे. हा आदेश 1 मार्च पर्यंत लागू राहील. सविस्तर नियमावली वृत्तात.