डॉक्टर पाठोपाठ ग्राम विकास अधिकारी देखील पोजेटीव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, February 23, 2021

डॉक्टर पाठोपाठ ग्राम विकास अधिकारी देखील पोजेटीव्ह


जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या डोणगांव मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन डॉक्टर कोरोना पोजेटीव्ह आले होते त्या नंतर २३ फेब्रुवारी रोजी येथील ग्राम विकास अधिकारी देखील कोरोना पोजेटीव्ह आल्याने डोणगांवकरांच्या चिंतेत वाढ झालेली आहे अश्यात  च जनता मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.

  

डोणगांव मध्ये गावाचे कोरोना पासून बचाव करणारे  कोरोना योध्येच कोरोना प्रदूर्भावास बळी पडत असल्याचे दिसून येत आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रचे सहाययक वैदयकीय अधिकारी व वैदयकीय अधिकारी कोरोना पोजेटीव्ह मिळून आले होते तर २३ फेब्रुवारी रोजी येथील ग्राम विकास अधिकारी हे मेहकर येथील कोविड सेंटर मध्ये घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये  कोरोना पोजेटीव्ह मिळाले  व सध्या ते कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत तर आज ग्राम पंचायत मधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी होणार असुम ग्राम विकास अधिकारी यांनी आव्हाहन केल की त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी ज्याने कोरोना प्रादुर्भाव इतरांना होणार नाही.

कोरोना प्रादुर्भाव पाहता  डोणगांव येथील बुधवारी भरणारा आठवडी बाजार हा भरणार नाही व नियमित भरणाऱ्या मंडी मधील सर्व व्यापाऱ्यांनी तोंडावर मास्क एकाच जागी पाच पेक्षा जास्त लोकानी जमुनये व सोशल डिस्टन्सचे पालन करावे कोरोना प्रादुर्भाव हा वाढत आहे तेव्हा आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य अबाधित ठेवण्या साठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर चणखोरे डोणगांव

Post Top Ad

-->