बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखली साठी
लॉकडाऊन आणखी कडक : जीवनावश्यक सोडून इतर सर्व दुकाने बंद
किराणा, औषधी, भाजीपाला आणि पीठ गिरण्या साठी वेळ सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंतच
दुध विक्रेत्यांना पहाटे 6 पासून सूट. संध्याकाळी 6 ते रात्री 8:30 पर्यंत सूट
वरील पाचही शहरांमध्ये रात्री 8 ते सकाळी 8:30 पर्यंत नाईट कर्फ्यु.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे लॉक डाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 6 पासून ते 1 मार्च सकाळी 8 पर्यंत नवीन आदेश कायम राहतील. बुलडाणा, चिखली, खामगाव, देऊळगावराजा आणि मलकापूर या पाच नगर परिषद क्षेत्रांतर्गत लॉक डाऊन कडक करण्यात आला आहे. जीवनावश्यक सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवावी लागणार आहे. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.