मिशन मेहकर स्वच्छ समिती तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन (Raktdan Shibir) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, February 22, 2021

मिशन मेहकर स्वच्छ समिती तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन (Raktdan Shibir)

सुनील मोरे मेहकर

शिवजयंती निमित्त "छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मेहकर" येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले

ह्या शिबीरा मध्ये  एकुण १०७ तरुणांनी रक्तदान करुन... छत्रपती शिवरायांना रक्ताभिषेकाने अभिवादन केले.. या वेळी सदर शिबीराला विविध मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी चे गजानन इगळे. गजेंद्र भिसे .अरूण पांडव . प्रविण पर्हाड  मान्यवरानी भेटी दिल्या.. व मेहकर येथील मानव सुरक्षा सेवा संघाचे  संतोष झोपाटे. गजानन लादे  यांनी सुद्धा रक्तदान केले 

सदर शिबीर आयोजन करण्यामागे मेहकर शहराच्या  मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्याना कडे जनतेचे लक्ष वेधल्या जाऊन भविष्यात होणाऱ्या  उद्यानाचे  विकासाचे काम हे पारदर्शक पणे व उच्च दर्जाचे व गतिने व्हावे हाच उद्देश डोळ्या समोर ठेऊन ह्या तरुणांनी सदर रक्तदान शिबीराचे आयोजन त्याच छत्रपती शिवाजी महराज उद्याना मध्ये करुन खऱ्या अर्थाने शिवरायांना अभिवादन करुन तरुणांनी  शिवजयंती निमित्त एक नविन संकल्पच केला.. डि.जे. ऐवजी  

ह्या रक्तदान शिबीराचे आयोजन 'मिशन मेहकर-स्वच्छ मेहकर समिती' च्या वतीने ॲड. प्रशांत तिफने पाटिल, अमित ससाणे,  व ईतर तरुणांनी केले होते.. या वेळी रक्त संकलन हे  दत्ताजी भाले रक्तपेढी, हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबाद यांनी केले होते...

Post Top Ad

-->