गेल्या काही दिवसांआधी इक्वाडोर (Ecuador) मध्ये लाईव्ह शोमध्ये (Live Broadcast) एका पत्रकाराला थेट चोराने लुटलं. ट्विटरवर याचा एक धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सगळ्यात गंभीर या फुटेजमध्ये पैशाची मागणी करणार व्यक्ती थेट बंदुक घेऊन धमकी देत आहे. हा सगळा प्रकार लाईव्ह घडल्यामुळे नागरिकांमध्ये आणि टीव्ही पाहणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण त्याने बंदूकीचा धाक दाखवल्यामुळे पत्रकार आणि व्हीडिओ शूट करणाऱ्याला त्याला पैसे द्यावे लागले. (shocking video reporter and tv crew robbed at gunpoint during a live broadcast)
या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. स्काई न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इक्वाडोरचे क्रीडा पत्रकार डिएगो ऑर्डिनोला गेल्या आठवड्यात गुआयाकिल शहरातील एस्टॅडिओ स्मारकाच्या बाहेरून DirecTV वर लाईव्ह देत होते. तेव्हा तिथे काही चोर आले आणि त्यानी लाईव्ह सुरू असतानाच त्यांना बंदूक दाखवली आणि पैशांची मागणी केली.
दरोडेखोरांनी बंदूक दाखवताच डिएगो यांनी आरडोओरड केली पण कोणीही मदतीसाठी आलं नाही. घाबरून दोघांनी चोराला पैसे दिले. मास्क घातलेल्या चोराने पैसे घेत बंदूक दाखवत तिथून धूम ठोकली. यानंतर कॅमेरामॅनने त्याच्यामागे धाव घेत तो कुठून जात आहे हेदेखील शूट केल्याचं तुम्ही या व्हीडिओमध्ये पाहू शकता.
खंरतर, हा चोर एकटा नव्हता तर त्याच्यासोबत आणखी दोनजण असल्याचंही व्हीडिओमध्ये दिसून येत आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून पोलीस या घटनेचा आणि दरोडेखोरांचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.