बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 1130 पॉझिटिव्ह(Buldana-Covid) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, March 27, 2021

बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 1130 पॉझिटिव्ह(Buldana-Covid)

(छायाचित्रे संग्रहित) 

 बुलढाणा:-शुक्रवारचा 903 विक्रमी कोरोना बाधितांच्या संख्या नंतर शनिवारी जिल्ह्यात तब्बल 1130 जण कोरोना बाधित निघाले आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात कोरोना चे समूह संक्रमण तरसुरू झालेले नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे

बुलढाणा जिल्ह्याच्या गेल्या एका वर्षाच्या इतिहासातील विक्रमी असे कोरोना बाधित निघाले आहेत. यामध्ये बुलढाणा तालुक्यात 247, चिखली तालुक्यात 192, मलकापूर तालुक्यात 136 आणि जळगाव जामोद तालुक्यात 114, मेहकर तालुक्यात 102, खामगाव तालुक्यात 84, शेगाव तालुक्यात 30, देऊळगाव राजा तालुक्यात 33, नांदुरा तालुक्यात 36, लोणार तालुक्यात 38, मोताळा तालुक्यातील 64, सिंदखेड राजा तालुक्यात 53, कोरोना बाधित निघाले आहेत.दरम्यान संग्रामपूर तालुक्यात एकही कोरणा बाधित निघालेला नाही

ब्युरो रिपोर्ट आपला विदर्भ लाईव्ह बुलढाणा

Post Top Ad

-->