33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशी ( 33 KOTI VRUKSH LAGVD CHAUKASHI ) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 11, 2021

33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशी ( 33 KOTI VRUKSH LAGVD CHAUKASHI )

 

 ( छायाचित्र संग्रहित )
33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी आमदारांची समिती

 राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीचा विशेष मोहीम याची चौकशी करण्यासाठी सोळा आमदारांच्या विधिमंडळाची समितीची घोषणा  वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली भरणे या समितीचे अध्यक्ष असतील आणि येत्या चार महिन्याच्या आत समिती सभागृहाला अहवाल सादर करेल या मोहिमेवर किती खर्च झाला किती झाडांचे संगोपन झाले याबाबत आमदार रमेश कोरगावकर यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत प्रश्न विचारला होता

 ( छायाचित्र संग्रहित )

वृक्षलागवड मोहीमेवर पंचवीस कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती त्यावर विधिमंडळ समिती मार्फत चौकशीचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्यानुसार भरणे यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे समितीतील सदस्यांची नावे जाहीर केली त्यात भरणे यांच्यासह सुनील प्रभू ,उदयसिंह राजपूत, बालाजी किणीकर ,अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, नाना पटोले, सुभाश धोटे ,अमित झनक, संग्राम थोपटे ,आशिष शेलार, नितेश राणे ,अतुल खळकर ,समीर कुणावर, आणि नरेंद्र भांडेकर यांचा या समितीत समावेश आहे

Post Top Ad

-->