अखेर लाचखोर अडकला 50 हजार घेताना buldhana - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 3, 2021

अखेर लाचखोर अडकला 50 हजार घेताना buldhana


बुलडाणा कंत्राटदाराचे थकित देयक काढून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकूनास  तीन मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे दीपक शंकर राव गोरे वय वर्ष 42 असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपीचे नाव असून मुळात वाशिम शहरातील गणेश पेठ मधील रहिवासी आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक संजय चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली बुलढाणा येथील प्रचार व  प्रसिद्धी कंत्राटदार असलेल्या एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्याचे शासकीय कामकाजाचे थकित असलेले देयक वरिष्ठांना सादर करून काढून देण्यासाठी सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून वर्ग-3 दीपक शंकरराव मोरे यांने  कंत्राटदारास एक लाख रुपयांची मागणी केली होती आरोपी दीपक शंकर गोरे हा सध्या सिंदखेड राजा येथील तेथेच राहत होता तो मूळचा रहिवासी वाशिम शहरातील गणेश पेठ मधील रहिवासी आहे दरम्यान दोन मार्च रोजी पडताळणीत लाच मागण्याचे समोर आले होते त्या त्यानुषंगाने तीन मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सिनखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय  परिसरात सापळा रचला होता त्यामुळे तक्रारदाराकडून  लाजेचा 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी दीपक शंकरराव मोरे यास रंगेहाथ पकडले सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लाच स्विकारतांना ही कारवाई एसीबीच्या  पथकाने केली या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक संजय चौधरी पोलीस नाईक विलास साखरे प्रवीण बैरागी  विजय मेहत्रे विनोद लोखंडे चालक मधुकर रगड असेच शेख यांनी सहभाग घेतला होता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड अमरावती परिक्षेत्र आणि अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले या  प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय चौधरी हे करीत आहेत दरम्यान शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने कोणतीही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान एसीपी चे पोलीस उपनिरीक्षक संजय चौधरी यांनी केले आहे

Post Top Ad

-->