गृहमंत्री अनिल देशमुख यांची सोशल मिडियावर बदनामी थांबवा अन्यथा कायदेशिर कार्यवाहीस सामोरे जा-ॲड.शैलेश देशमुख
APALA VIDARBH LIVE सुनिल मोरे मेहकर
गृहमंत्री मा.श्री.अनिल देशमुख यांनी कोरोना काळात संपुर्ण महाराष्ट्रात फिरुन पोलीस बांधवांना पाठबळ देण्याचे काम केले तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम करणार्या पोलीस बांधवांचा सत्कार देखिल त्यांनी केला गृहमंत्री अनिल देशमुख साहेब या काळात कोरोना पॉझिटीव्ह देखिल आले होते परंतू विरोधी पक्षाकडुन सोशल मिडीया ट्रायल चालवून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत अशा प्रवृत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा अशा लोकांना कायदेशिर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल अशा प्रकारचे निवेदन आज मेहकर एस.डि.ओ.राठोड साहेबांना देण्यात आले आले यावेळी ॲड.शैलेश देशमुख,ॲड,किशोर धोंडगे,ॲड.गजानन लांडगे,ॲड.भगवान भराड,ॲड.विनोद नरवाडे,ॲड.राजेश दाभाडे,ॲड.सिताराम कांबळे,ॲड.भिमराव डोंगरदिवे,ॲड.माधव घोडे,ॲड.शोएब खान,ॲड.रजनिकांत कांबळे उपस्थित होते