अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित YSHOMATI THAKUR - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, March 28, 2021

अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित YSHOMATI THAKUR

 अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित

     

अमरावती-:- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

     सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध          

अमरावती-: जि.मा.का. राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात येत आहे. त्याद्वारे अमरावती जिल्ह्यातही विविध विकासकामांना चालना मिळणार असून, २५ लक्ष निधी वितरित झाला आहे. सकल समाजाचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले._

     राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाकडून राज्यातील विकासकामांसाठी ५७ कोटी ३३ लाख रुपये अर्थसंकल्पित करण्यात आले आहेत.  त्यात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व तिवसा तालुक्यातील विविध कामांचा समावेश आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावी म्हणून निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार चालू टप्प्यात २५ लक्ष रुपये निधी शासनाने अमरावती जिल्ह्यातील कामांसाठी वितरित केला आहे.

       मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई येथील शेकूमियाँ दर्ग्याच्या विकासकामासाठी १० लक्ष रुपये, तिवसा तालुक्यातील कुऱ्हा मैदिव कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी ८ लक्ष रुपये, तर आखतवाडा येथे कबीरमियाँ दर्ग्याच्या विकासकामांसाठी ७ लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

यापुढेही आवश्यक विकासकामांसाठी वेळीच निधी उपलब्ध होण्यासाठी नियमित पाठपुरावा करू. प्रशासन यंत्रणेने ही कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावीत. इतर आवश्यक कामांसाठी वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

Post Top Ad

-->