बुलडाणा :-कोरोनामुळे गेल्या ४८ तासात जिल्यात तीघांचा मृत्यू झाला असून तब्बल ८३७ जण कोरोना बाधित
आढळून आले आहे.गेल्या एका वर्षाच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने संदिग्ध रुग्ण बाधित आढळून आल्याची हि पहिलीच वेळ म्हणावी लागेल .गेल्या ४८ तासात तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे जिल्यात आतापर्यंत १९८ जणांचा मृत्यू झाला असून जिल्याचा मृत्युदर सध्या १ टक्क्यावर आहे . दुसरीकडे तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णांचीही संख्या वाढली असून एकट्या
(छायाचित्रे संग्रहित )
बुलडाणा तालुक्यात तब्बल सध्या २७ जण कोरोना बाधित आढळले आहे . खामगाव मध्ये ५७,शेगावमध्ये ९०,देऊळगावराजांत ५, चिखलींत ८३, मेहकरमध्ये ३६,नांदुरा ६१,लोणार ९, मोताळा ६१, जळगाव जामोद ७७, सिंदखेडराजा ४७ , संग्रामपूर ९२, लाखनवाडा २ ,खासगी रुग्णालयातील १२ बाधित मिळून ८३७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत .
खासगी रुग्णालयातील १२ बाधित मिळून ८३७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत . तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असला तरी ते नेमके कोठील आहेत . हे स्पष्ट होऊ शकले नाही
कोविड समर्पित रुग्णलयात असलेल्या प्रयोगशाळेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी फक्त रॅपिड टेस्टचे अहवाल देण्यात आले होते . नंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यांनतर दोन दिवसांचे अहवाल ६ मार्च रोजी एकत्र देण्यात आल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे . मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने व त्यातच ४८ तासांत तिघांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना संक्रमण जिल्यात वाढल्याचे सार्वत्रिक चित्र तूर्तास तरी दिसत आहे.