(छायाचित्रे संग्रहित)
बुलडाणा:-गेल्या एक महिन्यापासून जीव टांगणीला लागलेल्या जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायत मधील सरपंच पदाची निवडणूक आता 19 मार्च रोजी होत आहे त्यामुळे गावात स्थानिक राजकारणाने वेग घेतला आहे प्रारंभी काढण्यात आलेला आरक्षणामध्ये संबंधित गावात त्या प्रवर्गातील व्यक्तीचे सदस्य म्हणून निवडून न आल्यामुळे या गावातील सरपंच पदाची निवडणूक रखडली होती संबंधित गावासाठी सरपंच पदाचे आरक्षण त्यामुळे नव्याने करावे लागणार होते 4 मार्च रोजी काढण्यात आले होते .
दरम्यान प्रारंभी 527 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिल्ह्यात 15 जानेवारी रोजी होऊन 18 जानेवारी रोजी निकाल लागला होता सोबतच ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान 493 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंचाची निवडणूक झाली होती त्यांचे कामकाज ही नंतर सुरू झाले मात्र काही ठिकाणी सरपंच पदाचा
फेसला अगोदर काढलेल्या आरक्षणामुळे होऊ शकला नाही अशा प्रलंबित सरपंचपदाची निवडणूक 19 मार्च रोजी दुपारी होणार आहे या निवडणुकीकडे २२ गावांचे लक्ष लागले आहे.