सर्वांच्या हातावर शिरणी भेटतच असल्याने राजरोसपणे अवैध वाळूचा धंदा सुरू आहे.
रॉयल्टीची पावती घेऊनका पैसे कमी द्या.
सध्या जालना जिल्हा मधील वाळूचा लिलाव झाला तेथून वाळू वाहतूक सुरू आहे पूर्वी जी वाळू रात्री जात होती ती अवैध वाळू सध्या दिवसा जाते त्या साठी संपूर्ण सेटिंग लागलेली आहे तर काहींची लावणे सुरू आहे अश्यात वाळूचा धंदा हा "केक कटेगा सबमे बटेगा" असा होऊन गेलेला आहे.
जालना जिल्हा व बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाटा वरून शेकडो टिप्पर डोणगांव मार्गे वाशीम,अकोला जिल्ह्यात दररोज वाळू वाहतूक करीत आहेत विशेष म्हणजे एका रॉयल्टीवर दोन ते तीन ट्रीपा करायच्या त्या साठी संबंधित सर्व विभागाची सेटिंग लावायची व दिवसा हा अवैध वाळूचा व्यवसाय करायचा या साठी मेहकर तालुक्यात सध्या एजंट सक्रिय झाले हे एजंट या ठेकेदारांच्या इतक्या गाड्या आहेत त्याचे किती होतील काहींना फिक्स करून अवैध व्यवसाय वैध करून घेण्या साठी सरसावले ज्याने दिवसभर डोणगांव मार्गे ही अवैध वाळूची वाहतूक होत आहे.
वाळूची रॉयल्टी पाहिजे असेल तर ही वाळू एका ब्रास मागे ५००,१००० रुपयाने महाग दिली जाते जर रॉयल्ट्रीची पावती पाहिजेत नसेल तर त्यावर भाव करून कमी किमतीत वाळू टाकली जाते एका दिवसात जास्त ट्रीपा झाल्या पाहिजे यासाठी ओवरलोड गाड्या निष्काळजी पणे भरधाव चालवल्या जातात ज्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा अवैध वाळूची मलाई संबंधित सर्व विभागाला पोचत असल्याने कोणीही यावर लक्ष देत नसल्याचे दिसून येत..