( छायाचित्र संग्रहित)
चाकूचा धाक दाखवीत वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोथ व दोन मोबाइल लंपास केल्याची घटना
चाकूचा धाक दाखवून सोन्याची पोथ लंपास करणाऱ्यांना अटक शरहातील नांदुरा रोडवरील एका घरात दोन चोरांनी चाकूचा धाक दाखवीत वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोथ व दोन मोबाइल लंपास केल्याची घटना दि २४ ऑकंटोबर २०२० मध्ये घडली होती . याप्रकरणात पोलिसांनी शिवाजी नगर येथील आरोपी रोहित सुभाष दिपके (वय-२३) ,एक अल्पवयीन या दोघांना दि ४ मार्च रोजी अटक केली .आरोपीना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली
या प्रकरणी मंगला सुधाकर देशमुख (वय ५५) यांणी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनीं अध्यात आरोपीच्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून ,पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले .
पोलीस तपसादरम्यान दोघ आरोपीकड्न गुंत्यात चोरलेली सोन्याची आठ ग्रॅम वजनाची पोत ,किंमत तीस हजार रुपये, सहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . हा गुन्हा उघडकिस आण्यासाठी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विश्र्वजीत ठाकूर, सहायक पोलीस उपनिरीक्षक रतनसिंग बोराडे पोलीस कॉन्स्टेबल संजय पठारे ,ईश्वर वाघ ,गोपाल तारूळकर ,सलीम बर्डे अनिल डागोर संतोष कुमावत ,सुभाष सरकटे यांनी तपास केला दुसरीकडे बुलडाणा , खामगाव सह मलकापूर परिसरात अशा घटना मध्ये वाढ झाली आहे
मध्यतरी बीड जिल्यातील एकास एलबीसीच्या पथकाने बुलडाणा बस्थानकावरून अटक केले होते