(छायाचित्रे संग्रहित)
हिंगोली जिल्ह्यात २ लाख ६६ हजारांचा अवैध दारुसाठा जप्त
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. तरी सुद्धा या काळात अवैध दारूचा मोठा व्यवसाय सुरु असल्याचे दिसून येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्या अंतर्गत विशेष मोहीम राबविली जात असून या मोहिमे अंतर्गत शुक्रवारी तीन ठिकाणी छापा मारुन २ लाख ६६ हजार ३९६ रुपयांचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंर्तगत पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु साठा व दारुविक्री विरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत शुक्रवारी वसमत शहर येथे दोन ठिकाणी तर सेनगाव येथे एका ठिकाणी अवैध दारुसाठा केल्याच्या माहितीवरुन छापा टाकला असता आरोपींकडून २ लाख ६६ हजार ३९६ रुपयांचा १८५.३४ लिटर अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला. आरोपींविरुध्द दारुबंदी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या मौजे सातेफळ वाघ येथे शुक्रवारी तीन आरोपींनी अवैधरित्या विक्रीसाठी दारू बाळगल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळाहून आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या मौजे सातेफळ वाघ शिवारामध्ये ही घटना घडली.