अकोल्यात आज रात्रीपासून पूर्ण लॉकडाऊनची घोषणा, वाचा कधीपर्यंत असणार निर्बंध(Lockdown in Akola) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, March 12, 2021

अकोल्यात आज रात्रीपासून पूर्ण लॉकडाऊनची घोषणा, वाचा कधीपर्यंत असणार निर्बंध(Lockdown in Akola)

(छायाचित्र संग्रहित)

अकोला 12 मार्च : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases In Maharashtra) झपाट्यानं होणारी वाढ चिंतेत भर घालणारी आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात आज रात्रीपासून लॉकडाऊनची (Lockdown in Akola) घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजेच शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून 15 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सगळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेताल काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हे लॉकडाऊन आज रात्री आठ वाजल्यापासून १५ मार्चला सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. आवश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहाणार आहे. तर, पेट्रोल आणि डिझेलही केवळ अत्यावश्यक सेवेतील गाड्यांनाच दिलं जाणार आहे.

राज्यात गुरुवारी नव्या 13,659 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 7,193 जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 57 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 22 लाख 66 हजार 374 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 21 लाख 6 हजार 400 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 52,667 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 6 हजार 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात नाईट कर्फ्यू -

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता पुण्यातही नाईट कर्फ्यू (Night Curfew in Pune) लावण्यात आला आहे. तर, नागपूरमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबाद, पालघर, ठाणे, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोना केस पाहाता नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली गेली आहे.


Post Top Ad

-->