(छायाचित्रे संग्रहित)
भारता गेल्या तीन महिन्यातील वाघांच्या एकू ण मृत्यूपैकी सर्वाधिक ६४ टक्के मृत्यू मध्यभारतात झाले आहेत. यातील ४१ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात तर २३ टक्के मृत्यू मध्यप्रदेशातील आहेत. विशेष म्हणजे, यातील अधिकांश मृत्यू संशयास्पद असल्याने वाघांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
‘क्लॉ’ या संस्थेकडून दरवर्षी संपूर्ण भारतातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी दिली जाते. या आकडेवारीनुसार, दर दोन दिवसात एक वाघ मृत्युमुखी पडत आहे. यावर्षी पहिल्या तीन महिन्यातच संपूर्ण भारतात ३९ वाघ मृत्युमुखी पडले. यातील महाराष्ट्राची आकडेवारी हादरवणारी आहे. राज्यात नवीन वर्षाची सुरुवात तीन वाघांच्या मृत्यूने झाली. उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात दोन बछड्यांसह वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला. राज्यातील वाघांच्या एकू ण मृत्यूंपैकी ५० टक्क्याहून अधिक मृत्यू शिकारीकडे अंगुलीनिर्देश करणारे आहेत. यवतमाळ जिल्ह््यातील वाघिणीचा मृत्यू ‘वायरट्रॅप’ मध्ये अडकू न झाला. त्यामुळे शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या सापळ्यांना शोधून काढण्याचे आव्हान वनखात्यासमोर आहे. वाघांच्या शिकारीसाठी ‘स्टील ट्रॅप’चा वापर करणाऱ्या बहेलिया टोळीचा महाराष्ट्राला असणारा धोका कमी झाल्यानंतर खाते सुस्तावले. मात्र ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील वर्षी हे सापळे आढळले होते. आता स्थानिक शिकाऱ्यांकडून वापरले जाणारे ‘वायर ट्रॅप’चे आव्हान आहे. चंद्रपूर जिल्ह््यात पळसगाव वनक्षेत्रात काही वर्षांपूर्वी ‘स्ट्रील ट्रॅप’मध्ये दोन वाघ अडकल्यानंतर तातडीने ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्रप्रकल्पाला हे सापळे शोधून काढणारे ‘मेटल डिटेक्टर’ देण्यात आले होते. ही अत्याधुनिक यंत्रणा खात्याकडे असतानाही गस्त घालताना त्याचा वापर के ला जात नाही. त्यामुळेच अलीकडच्या काही वर्षात व्याघांच्या मृत्यूचा आलेख उंचावला आहे.
भरधाव कारच्या धडकेत बिबट्या ठार
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली-पद्मापूर मार्गावर कक्ष क्रमांक १८४ मध्ये एका भरधाव कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनविभागाचे क्षेत्र सहायक देऊळकर हे कर्मचाऱ्यांसह गस्तीवर असताना त्यांना पाच ते सहा वर्षांचा नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. बिबट मृतावस्थेत आढळून आलेल्या ठिकाणापासून २५० मीटर अंतरावर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला. वाहनाची सखोल चौकशी केली असता, वाहनाच्या समोरील चाकांवर आणि बोनेटवर बिबट्याचे केस आढळून आले. वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत होते. अपघात वाहनातील सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याचे डॉ. कडूकर, डॉ. खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.