कारागृहात सात कर्मचारी आणि दोघा गुन्हेगारांकडून लैंगिक अत्याचार, नागपुरात तृतीयपंथी कैद्याची तक्रार(Nagpur-Atyachar) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, March 27, 2021

कारागृहात सात कर्मचारी आणि दोघा गुन्हेगारांकडून लैंगिक अत्याचार, नागपुरात तृतीयपंथी कैद्याची तक्रार(Nagpur-Atyachar)

 

                                                                  (छायाचित्रे संग्रहित) 

कारागृहात सात कर्मचारी आणि दोघा गुन्हेगारांकडून लैंगिक अत्याचार, नागपुरात तृतीयपंथी कैद्याची तक्रार 

नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कर्मचारी आणि गुन्हेगारांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तृतीयपंथीयाने केला आहे. हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या तृतीयपंथीयाच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार संबंधित तृतीय पंथीयाने केली आहे. कारागृहातील सात कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगारांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथीयाची न्यायालयाला पत्र लिहून तक्रार

हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या तृतीयपंथीयाने न्यायालयाला पत्र लिहून तक्रार केली होती. लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी नऊ जणांवर नागपुरातील धंतोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

नागपुरात बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. शंभर रुपये किमतीच्या 102 बनावट नोटा आणि साहित्य जप्त करण्यात आलं. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

या टोळीतील दोघे जण 19 मार्चला पहाटे तीन वाजता नागपुरात शंभर रुपयांच्या बनावट नोटा विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे टिळक पुतळा चौकात पोलिसांनी सापळा लावून दोन आरोपीना जाळ्यात अडकवले. त्यांच्याकडून पोलिसांनी शंभराच्या 102 बनावट नोटा जप्त केल्या.

आठ लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त

चौकशीत या दोघांनी चार साथीदारांची नावे सांगितली. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार मोबाईल, एक कार, एक टू व्हीलर तसेच नोटा छापण्यासाठी वापरल जाणारा कलर प्रिंटर असा एकूण आठ लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास सुरु आहे.


Post Top Ad

-->