( छायाचित्र संग्रहित )
जळगाव व बुलडाणा जिल्ह्याची रॉयल्टी घेऊन नागपुरात वाळूची तस्करी करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे झोन 5चे डीसीपी नीलोत्पल यांच्या पथकाने ही कारवाई केली महादुला टी पॉइंट वर मध्यरात्री दोन ते सकाळी सहा वाजताची दरम्यान पोलीस नाकाबंदी करीत असतात त्यामुळे वाळू माफिया हे नाकाबंदी उठल्यानंतर तस्करी करू लागले डीसीपी नीलोत्पल यांना याची माहिती होताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले त्यानुसार बुधवारी सकाळी महादुला t-point कडून जाणारे 12 टिप्पर पकडण्यात आले पाच टिप्पर मध्ये योग्य प्रमाणात वाळू आढळून आली त्यांच्याकडे रॉयल्टी चे दस्तावेज होते त्यानंतर त्यांना सोडण्याचा आदेश देण्यात आला व उर्वरित सात टिप्परमध्ये जास्तीची रेती आढळून आली आरटीओद्वारे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली
( छायाचित्र संग्रहित )
उर्वरित टिप्परच्या तपासणीत गैरप्रकार दिसून आला हे टिप्पर सावनेरच्या घाटावरून रवाना झाले होते त्यांच्याकडे दस्तावेज होते ते नागपूरला वाळू घेऊन जाण्याची होते यासाठी त्यांना बारा तासाची वेळ देण्यात आली होती दोन तासाच्या अंतरासाठी बारा तासांची मुदत दिल्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटले पोलिसांनी जेव्हा त्यांच्या ऑनलाईन दस्तावेजांची मागणी केली तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला यात जळगाव व बुलडाणाचा पत्ता होता मुळात ते वाहन कधी जळगाव बुलडाण्याला गेलेच नाही पोलिसांनी तहसीलदार व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना या प्रकाराची माहिती दिली त्यांनी जळगाव बुलडाणा साठी बारा तासांची मुदत दिल्याचे सांगितले परंतु चालकाकडे सापडलेल्या दस्तावेज आवर नागपूरचा पत्ता कसा यावर मात्र अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत यानंतर पोलिसांनी ते सर्व टिप्पर जप्त केले पोलिसांनी जिल्हा खनिकर्म विभागाला पत्र लिहून माहिती मागविली आहे