(छायाचित्रे संग्रहित)
वर्धा : वर्ध्यात अल्लीपूर धोत्रा मार्गावर भरधाव टिप्परला आग लागली. आगीत टिप्पर जळून खाक झाला. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने वाहनातून उडी घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु टिप्परचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Wardha Tipper Truck Fire Driver Saved)
केबिनच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट
अपघातग्रस्त टिप्पर पुलगाव येथील भारत नागपाल यांचा असून वाळू आणण्यासाठी जात होता. धावत्या टिप्परच्या केबिनच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली. वाहनाला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्र रुप धारण केले.
आग विझली, मात्र टिप्परचे नुकसान
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. आग विजविण्याचा प्रयत्न केला. हिंगणघाट येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नाशिकमध्ये बाईक अपघातात बालकाचा मृत्यू
नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवर बुधवार रात्री दुचाकी आणि टाटा 407 टेम्पोचा अपघात झाला होता. नाशिक महापालिकेचे कर्मचारी रोहित पवार यांचा 6 वर्षीय मुलगा प्रणय रोहित पवारचा मृत्यू झाला. तर रोहित आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. (Wardha Tipper Truck Fire)
पवार कुटुंब बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन अंबड लिंक रोडने जात होते. त्यावेळी विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या टेम्पोने पवार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मुलगा प्रणय पवारचा मृत्यू झाला.
पाईप लाईनच्या कामामुळे अपघाताचा आरोप
या ठिकाणी काही दिवसांपासून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने रस्त्या वळवण्यात आला आहे. एकेरी रस्त्यावर दोन वे करण्यात आले आहेत. मात्र या बाबतीत ठेकेदाराने सूचना फलक न लावल्याने अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. दरम्यान ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.