बुलडाणा जिल्ह्यातील डोणगांव येथील हिन्दु स्मशाण भुमी जवळील काच नदीवर पुल बांधण्याची मागणी
भारतीय जनता पार्टीचे युवा तालुका अध्यक्ष सागरभाऊ बाजड व जिल्हा उपध्यक्ष अर्जुनरावजी वानखेडे यांच्या मार्गदर्शना खाली यांच्या नेतृत्वात ग्रामविकास अधीकारी ग्राम पंचायत कार्यालय डोणगांव यांना निवेदणा तुन मागणी करण्यात आली.कि
डोणगांव मधील हिन्दु स्मशान भुमी जवळ असलेल्या काच नदी पाञावर पुल बांधणे अत्यंत आवश्क आहे.कारण सदर च्या ठिकाणा वरुन काही अंतरावर पाटबंधारे विभागा कडुन काही वर्षा पुर्वी शेतजमीनीची आणी गावाची वाटर लेवल वाढावी या साठी नदी पाञात भिंत बांधण्यात आली परंतु भिंत बांधताना नको त्या ठिकाणी भिंत बांधल्यामुळे सदरच्या ठिकाणा पासुन पाठी मागे पाणी तुंबल्याने कर्हाळवाडी,लोणी गवळी, आंध्रुड,शेलगाव इत्यादी शेत शिवारात शेतजमिनी असलेल्या नागरिकांना जान्या ऐन्याचा रस्ता नदी पाञात तुंबलेल्या पाण्या मुळे बंद झाला आहे.परंतु तरी देखील नागरीक वेळ वाचण्यासाठी तुंबलेल्या पाण्यातुन ऐजा करत आहे व त्यामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक ञास होत असुन नागरिकांना पावसाळ्या मध्ये अनेक अडचणीला सामोर जावे लागते आणी नदीच्या या तिरावरुन त्या तिरावर जाण्यासाठी गावातील नागरीक,शेतकरी व मजदुर कंबरे पेक्षा जास्त पाण्यातुन ऐजा करत असतात कारण दुसर्या बाजुने जाण्यासाठी नागरिकांना ३ ते ४ किलो मिटर दुरवरुन फिरुन यावे लागते त्या मुळे ग्रामस्त वेळ वाचवण्या करता जिवाची परवा न करता जिव धोक्यात टाकुन नदी पार करतात त्यामुळे नागरिकांच्या जिवाचे बरे वाईट होऊ नये यासाठी ग्रामपंयात प्रशासणाने तत्काल या मागणीची दखल घेऊन सदर नदीवर पुलचे बांधकाम करावे सदरची मागणी लवकर पुर्ण न झाल्यास व त्या ठिकाणी ऐखादी दुरदैवी घटणा घडल्यास त्यास जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभाग राहील.अशे सागरभाऊ बाजड यांनी निवेदनातुन म्हटले आहे व काच नदीवर पुल बांधण्याची मागणी केली आहे. यावेळी भागवतराव बाजड ( सामाजिक कार्यकर्ते), अरुणराव वडावकर, विलास परमाळे शहर अध्यक्ष भाजपा,आकाश दादा बाजड युवा नेते,रोहीत डागर, राहुल श्रीनाथ,चंद्रकांत वाघमारे,रोहीत गवई,अक्षय काळे,हरिष इंगळे,साजन शाह,हुशेन गवई,सचीन मोरे,अंकुश मोहळे इत्यादी उपस्थितीत होते.