Buldana,केंद्र सरकार Central Government तेलबिया स्टाक लिमिट आणि Of the State Governmentराज्य सरकारचा अतिवृष्टी अल्पमदत जि आर ची होळी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, October 20, 2021

Buldana,केंद्र सरकार Central Government तेलबिया स्टाक लिमिट आणि Of the State Governmentराज्य सरकारचा अतिवृष्टी अल्पमदत जि आर ची होळी


 केंद्र सरकार तेलबिया स्टाक लिमिट आणि राज्य सरकारचा अतिवृष्टी अल्पमदत जि आर ची होळी

बुलडाणा ता मेहकर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संपूर्ण राज्यात सरकारचा विरोधात निदर्शने देऊन केंद्र व राज्य सरकारचा जी आर ची होळी करून आंदोलन करण्यात आले. मेहकर तहसील कार्यालया समोर राज्य प्रवक्ता अँड जितुभाऊ अडेलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले

 शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाचा बळी ठरतो. अस आम्ही आजपर्यंत सांगत आलो आहे यावर्षी हवामान तज्ञाचे सर्व अंदाज खोटे ठरवत अतिवृष्टीने कहर केला त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे नैसर्गिक आपत्तीला कोणी निमंत्रण देत नाही नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक घटकाला मदत करणे हे राज्य आणि केंद्र सरकारचे काम आहे मदत तर शेतकऱ्यांना मिळाली नाही पण शेतीमालाचे भाव पाडण्याचे षडयंत्र मात्र रचल्या गेले आहे केंद्राने निर्यातबंदी लावून कांद्याचे भाव पाडले मग सोयाबीन पेंड आयात करून सोयाबीनचे भाव पाडले आत्ता सोयाबीन तेलावर साठा मर्यादा लावून. 

रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देताना
त्यामुळे शेतकरी निव्वळ हवालदिल नाही तर शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे शेतकऱ्यांच्या मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या जीआर ची होळी करून शेतकर्‍यांच्या वतीने निषेध करीत आहोत जिरायतीला हेक्टरी 60000 बागायतीला  एक लाख रुपये हेक्टरी तातडीने मदत द्यावी तसेच चालू पीक कर्ज माफ करण्यात यावे शेतीपंपाची वीज बिल माफ करण्यात यावे. खरीप हंगाम सन २०२०-२१व सन २०२१-२२ या काळातील पिकविमा लागु करावा अतिवृष्टी झाल्याने खचलेल्या विहीरीचा पंचनामा करून मदत देण्यात यावी.बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मंडळास सरसकट अतिवृष्टीची मदत देण्यात यावी 


केंद्र सरकार तेलबिया स्टाक लिमिट आणि राज्य सरकारचा अतिवृष्टी अल्पमदत जि आर ची होळी                          VIDEOS https://youtu.be/S0RyFtvWf-Q

यावेळी उपस्थित अँड जितुभाऊ अडेलकर राज्य प्रवक्ता अँड संदिप गवई जिल्हा उपाध्यक्ष, गोपाल पाचपवार जिल्हा सचिव, महेश काळे तालुका अध्यक्ष,राज आखरे युवा अध्यक्ष आकाश मोसबे अध्यक्ष विआ आकाश वसवकर शहर अध्यक्ष, सिध्दार्थ गव्हादे, गजानन नरवाडे,राजु जाधव, गजानन मर्दाने, अँड कांबळे,विशाल पगारे,सुशील पिटकर, रमेश शिरसाट,दिपक शिरसाट, पंडित नरवाडे, जनार्दन गोरे, संदिप गवई ,कुणाल माने, अमोल गारोळे,दिपक बनसोडे, गोपाल घनवट,मनोज चव्हाण, दिपक जाधव, गणेश राठोड, संजय राठोड, अनिल सरदार बन्शी जाधव पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते

Post Top Ad

-->