पीक विम्याच्या घोळाबाबत शेतकरी आक्रमक
(आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानप लोणार बुलडाणा)
कृषी अधिकाऱ्याला घातला घेराव दीड तास चालले आंदोलन मागील वर्षीचा पिक विमा यावर्षी उशिरा शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे मात्र शेगाव तालुक्यातील अनेक मंडळांमधील शेतकऱ्यांना पिक विमा चा भरलेल्या हफ्त्यापेक्षाही कमी रक्कम मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. यामध्ये आजही मनसगाव शिवारातील शेतकऱ्यांनी शहरातील कृषी कार्यालय गाठून तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घालून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. दीड तास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधीक्षक यांना घेराव घालून बसले होत
कृषी अधिकाऱ्याला घातला घेराव दीड तास चालले आंदोलन लिंक वर क्लिक करा आणि बघा व्हिडिओ
2020 साली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी काढलेल्या विमा संदर्भात विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे मात्र ही रक्कमअनेक शेतकऱ्यांना २०० ते ५०० च्या घरात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत एका एकरासाठी 900 रुपये पीक विम्याचा हप्ता भरलेला असताना एकूण मदत दोनशे ते तीनशे रुपये मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत यामध्ये आज शेगाव तालुक्यातील मनसगाव मंडळ मध्ये येणाऱ्या पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय अचानकपणे गाठून त्यांना घेराव घातला सात दिवसांपूर्वी शेतकर्यांचे शिष्टमंडळ घेऊन गेले होते आणि त्यांना पुढील सात दिवसांमध्ये लेखी अहवाल आणि उत्तर देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही कृषी अधिकारी कार्यालयाने कुठलेच पावले उचलली नसल्याने शेतकरी आज संतप्त होते दीड तास चाललेल्या या घेराव आंदोलनामध्ये ची माहिती पोलिसांना मिळताच दंगा काबू पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.