खामगांव ते आलेगाव बसउतावली पुलावरून घसरली.चालक वाहाक प्रवाशी सुखरूप बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकरशा येथुन एक किलोमिटर अंतरावर असलेल्या पुलावरून खामगांव ते आलेगांव जाणारी खामगाव आगाराची बस क्र. एम. एच.40. एन-8922 ही बस खामगाव मार्गे अटाळी, देऊळगाव साकरशा, मळसुर, आलेगांव ही बस सकाळी नऊ वाजता उतावळी नदीच्या पुलावरून घसरली. बस मध्ये एकुण चार प्रवाशी व चालक इब्राहीम खान व वाहक सोनुने होते. उतावळली नदीच्या पुलावर मोठ मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे व पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस पुलावरुन घसरली व बाजुला गाळ आणि रेती मध्ये अर्धवट पलटी झाली.गाडी मधील चालक, वाहक व चाऱही प्रवाशी सुखरूप बाहेर काढण्यात आले. ह्यावेळी सरपंच संदीप अल्हाट, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाअध्यक्ष प्रमोदबापू देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष बी. एम. राठोड,अरुण गायकवाड, रामचंद्र राठोड, गौरव देशमुख, रमेश काळे, नवल राठोड, इरफान पठाण, शाम शिंदे,यांचेसह गावकरी यांनी मदत केली.
विशेष पुलावरून वाहत असलेल्या पाण्यामध्ये एसटी बस कोसळली व यामध्ये चार प्रवासी बचावले आहे सुदैवाने बस पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला हे विशेष