बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील औरंगाबाद नागपूर राज्य महामार्ग रुंदीकरण विषयी नोटीस दिल्यावर व्यापाऱ्यांनी भूमिअभिलेख मार्फत गावठाणातील रस्त्याची मोजणी करून नंतर रस्त्याच्या मध्यापासून 12 मीटरची हद्द कायम करा या अनुषंगाने भूमिअभिलेख उप अधीक्षक मेहकर यांना एक निवेदन देण्यात आले.
डोणगाव वरून औरंगाबाद नागपूर राज्य महामार्ग जातो मात्र हा रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीयमार्ग म्हणून निवडला ज्याने पूर्वी या रस्त्याची जी हद्द होती रस्त्याच्या मध्यभागातून 12 मीटर ती वाढवून पूर्वी पासून या ठिकाणी 12 मीटर अंतर सोडून बांधलेले दुकाने ही अतिक्रमित ठरवणारी अशी जाचक नोटीस देण्यात आली ज्याने कसेतरी पोट पाणी भरणारे शेकडो दुकानदार व त्या दुकानावर आधारलेल्या हजारोच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला यावर हा रस्ता मध्य पासून दोन्ही कडे 12 मीटरच करा या मागणीचा निवेदन खासदार प्रतापराव जाधव,पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे,जिल्हा अधिकारी,उप विभागिय महसूल अधिकारी,तहसीलदार यांना देण्यात आले.
गावठाण मधील कोणताही रस्ता असो त्याची सीमा निश्चित करणे व त्याचा नकाशा हा भूमी अभिलेख विभागात असतो तेव्हा डोणगाव मधील जाणाऱ्या रस्त्याची देखील भूमिअभिलेख मार्फत सीमांकान होऊन त्या नंतरच रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही कडे 12 मीटर घेऊन राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू करावे या आशयाचे एक निवेदन डोणगाव येथील व्यापारी यांनी 16 अक्टोबर रोजी भूमिअभिलेख उप अधीक्षक यांना देण्यात आले.