वन विभागाच्या रेस्क्यू चमूने आक्रमक झालेल्या माकडाची दहशत संपवली बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी वन परिक्षेत्रात अंतर्गत येत असलेले ग्राम गोहगाव दांदडे येथील ग्रामस्थ मागील काही महिन्या पासून (Under the terror of monkeys)माकडांच्या दहशतीखाली जीवन जगत होते गावकऱ्यांनी वर्गणी करून गावातील माकडे पकडण्या साठी लोक बोलावून त्यांनी 35 माकडे पकडून जंगलात सोडली मात्र पुन्हा नवीन संकट उभं राहिलं गावात असलेला एक माकड आक्रमक झाले होते त्याच्या दाहशतीने गावकरी चिंता ग्रस्त झाले होते तो आक्रमक माकड वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद करून गावकऱ्यांना चिंता मुक्त केले
ग्राम गोहगाव दांदडे येथे मागील काही महिन्या पासून माकडांच्या त्रासाला गावकरी कंटाळले होते कधी माकड पत्रावर उडी मारून पत्रावर ठेवलेले दगड घरात पडेल याचा नेम नव्हता तर माकड अंगावर आल्याने काहीजणांना गंभीर दुखपतीस सामोरे जावे लागले होते यावर ग्रामस्थांनी वर्गणी करून माकडे पकडणाऱ्यांना 23 सप्टेंबर रोजी बोलावून माकडे पकडून जंगलात सोडायला लावले यात त्यांनी 35 माकडे पकडली व अभयारण्यात सोडली होती तेव्हा गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला,
मात्र या आनंदावर काहीच दिवसात विरजण पडले गावात राहिलेल्या माकडा मधील एक म्हाळ्या हा खूपच आक्रमक जो गावकऱ्यावर हल्ले करू लागल्याने गावात आक्रमक झालेल्या माकडाची दहशत निर्माण झाली ज्यावर सरपंच प्रदीप काळे व पोलीस पाटील सुनील देशमुख यांनी घाटबोरी वनपरिक्षेत्रात कार्यरत वनपाल जे एस सोनोने यांना माहिती देऊन त्यांनी बुलडाणा येथील रेस्क्यू टीमला बोलावून आक्रमक झालेल्या माकडाला गुंगीचे औषधांचे इंजेकशन देऊन जेरबंद केले या वेळी वनरक्षक भोंडणे,वनरक्षक सिंगल,वनरक्षक ठाकरे व बुलडाणा येथील रेस्क्यू टीम सोबत सरपंच,पोलिस पाटील हजर होते .