विदर्भ गौरव पुरस्कार पत्रकार फिरोज शाह यांना जाहीर
|
पत्रकार फिरोज शाह |
नामांकित आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने २०२१चा (Vidarbha Gaurav Award)विदर्भ गौरव पुरस्कार पत्रकार फिरोजशाह यांना जाहीर करण्यात आला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार रविवार १७ ऑक्टोंबर रोजी जाहिर करण्यात आला आहे. फिरोजशाह हे वाशिमचे युवा व नामांकित पत्रकार आहेत. गेल्या ५ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी नि:पक्ष, निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, पर्यावरण, साहित्य, धार्मिक, क्रीडा व कृषी आदी क्षेत्रातील अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने लिखान केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षित, वंचित व शोषितांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी उत्तेजनार्थ सन २०२१ या वर्षाचा फिरोजशाह यांना विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.उपेक्षित, वंचित, शोषित व दीनदुबळ्यासाठी काम करत आहे. आई-वडीलांच्या आशीर्वादामुळे ते शक्य झाले. आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेनने कार्याची दखल घेतली. याचा मला खूप आनंद झाला. मी या संस्थेचा आभारी आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार माझ्या सर्व मार्गदर्शकांना अर्पण करतो. हा पुरस्कार मला प्रेरणा देईल, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.