शेतातील सोयाबीन काढणी करून घरी घेवून जाताना चालकांचा ताबा सुटल्याने 30 क्विंटल सोयाबीन सह (Incident of tractor falling into well) टॅक्टर विहिरीत पडल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील असोला येथे घडली.असोला येथील मारोती इंगोले यांच्या टॅक्टरमधील सोयाबीन विहिरीत पडल्याने सोयाबीन सह टॅक्टर चे दोन लाखाच्या वर नुकसान झाले आहे.
या विचित्र अपघातात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळं आधीच अतिवृष्टीमुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आल्याने जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
चालकांचा ताबा सुटल्याने 30 क्विंटल सोयाबीन सह टॅक्टर पडला विहिरीत शेतकऱ्यांच मोठं नुकसान