ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न एम.आय.एमच्या पुढाकाराने
(APALA VIDARBH LIVE साजिद शेख कारंजा वाशिम) कारंजा शहर ऑल इंडिया इतेहादुल मुस्लेमीनने मंगळवार दिनांक 19 ऑक्टोबर ला ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने मंगळवार १९ ऑक्टोबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील मेमण जमाअत खाना या इमारती मध्ये केले होते. या रक्तदान शिबारात मोठ्या उत्साहाने शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.या मध्ये 70_रक्तदात्यांनी रक्तदान करून ईद ए मिलादुन्नबी साजरी केली.सौ.कांता काळे रक्तपेढी वाशिम विभागातील डॉक्टर व कर्मचारी,दिगांबर पाटील,कीसन गोटे, रामेश्वर फुके,पवन वानखेडे यांनी रक्तदात्यांची विषेश काळजी घेतली.व रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले.रक्तदात्यांसाठी चाय व नाश्त्याची व्यवस्था आयोजकांनी केली होती.या शिबीरात शहरातील नामवंत लोकांनी सहभाग नोंदविला व आयोजकांची प्रशंसा सुध्दा करण्यात आली.या शिबिराचे आयोजन ऑल इंडिया इतेहादुल मुस्लेमीन कारंजा शहराध्यक्ष सैय्यद नसीरुद्दीन,तालुकाध्यक्ष यासीर खान,युवा शहराध्यक्ष तौसीफ खान, कारंजा जनरल सेक्रेटरी युसुफ खान, कारंजा महासचिव अजिम शहा केले होते.व आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानले.व रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.