( आपला विदर्भ लाईव्ह फिरोज शाहा वाशिम)
सणासुदीच्या काळात खडकी सदार गावं अंधारात MSEDCL's mismanagement महावितरणचा भोंगळ कारभार चाऱ्हाट्यावर दिप उजळवणारी दिवाळी मात्र खडकी येथील नागरिकांची अंधारात साजरी होण्याच्या मार्गावर महावितरणचे याकडे दर्लक्ष
रिसोड तालुक्यातील खडकीसदार या गावांसाठी तब्बल चार महीन्यापासुन विद्युत तंत्रज्ञ नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात सुद्धा गावाला अंधाराच्या कलोख्यात राहण्याची वेळ आली आहे. नवरात्रीच्या रात्री अंधाराचा गेल्या आणि येणारा सण दिवाळी ही सुद्धा अंधारात जाते की काय अशी चिंता गावकऱ्यांना लागली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभार पुन्हा चाऱ्हाट्यावर आला असून याकडे सबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. गाव नेहमीसाठी अंधारात राहते. तसेच वेळोवेळी विज पुरवठा खंडीत होत असल्यास गावातील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन विद्युत रोहीत्र बंद पडल्यास,फ्युज गेल्यास,डिओ गेला असल्यास ही सर्व कामे गावातील लोकांनांच करावी लागतात.दुदैवाने विपरीतघटनाघडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबतची दखल महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. पण महावितरणचे अधिकारी गावकऱ्यांच्या प्रश्नाला कानाडोळा करत असल्याचे समजते.तर गावांसाठी जी रोहीत्र उभी आहे ती रोहीत्र ओव्हरलोड होत असुन वारंवार विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. तरी या गंभीर बाबीची स्थानिक विद्युतवितरणचे अभियंता यांनी गावातील स्थितीची तत्काळ पाहणी करुन नवीन रोहीत्र(जादा) उपलब्ध करून देण्यात यावे.व नवीन विद्युत तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात यावी.अशी मागणी नागरीक करीत आहेत. तरी याला महावितरण विभाग कितपत गांभीर्याने घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.( हे सुद्धा वाचा केंद्र सरकार तेलबिया स्टाक लिमिट आणि राज्य सरकारचा अतिवृष्टी अल्पमदत जि आर ची होळी )