(Police crackdown)कोट्यवधी रुपयांचा गांजा पोलिसांनी केला जप्त(आपला विदर्भ लाईव्ह रूपेश बाजड रिसोड वाशीम)
वाशिम जिल्ह्यातील रिसोड कोट्यवधी रुपयांचा गांजा (Marijuana worth crores of rupees)जात असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी आज 18 ऑक्टोबर रोजी रिसोड हिंगोली मार्गावर तीन ठिकाणी सापळा रचला एक आयशर मधुन तब्बल 11 क्विंटल 50 किलो (Cannabis seized)गांजा जप्त केला जप्त केलेल्या गांजा ची किंमत 3 कोटी 45 लाख रुपये असून 20 लाख रुपयाचे वाहन सुद्धा जप्त केले.
जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत तीन कोटी 65 लाख रुपये असून यात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड पोलीस स्टेशनला हिंगोली जिल्ह्यातून बुलडाणा जिल्हाकडे रिसोड मार्गे गांजा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशावरून ठाणेदार नवलकर यांनी आपल्या पोलिस ताफ्यासह रिसोड हिंगोली मार्गावरील एका धाब्याजवळ आयशरला अडविले असता त्यातून कोंबडीचे खाद्यच्या आड गांजा तस्करी होत असल्याच उघड झाले वाहन चालकाकडे बिल्टी सुद्धा आढळून आली मात्र ठाणेदार नवलकर यांनी गांजा तस्करीचे पितळ उघडे केले सदर कारवाईत 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व बुलडाणा जिल्ह्यातील असून या चारही आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
या कारवाईत ठाणेदार नवलकर यांच्यासह पो उप नि संतोष नेमणार,psi शिल्पा सुरगडे,HC अनिल कातडे, Npc रंजवे,भागवत कष्टे,सुशील इंगळे,गुरुदेव वानखडे, यांनी सहभाग नोंदविला आहे