मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान शेतकरी त्रस्त
(आपला विदर्भ लाईव्ह रुपेश बाजड रिसोड ) वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या मुसळधार पावसामुळे ऐन सोयाबीन काढणी साठी आली असल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांना अंकुर फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन कपाशी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन सांगून शेतात ठेवल्या तर काहींनी गंजी मारल्या असल्यामुळे काहींच्या सुट्या पाण्याखाली आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. रिसोड तालुक्यातील मुसळधार पावसाने पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन काढणी ला आलेली असता पावसामुळे शेतात