वाशिम;ततच्या अवर्षणामुळे वाशिम जिल्ह्यात पाण्याची बिकट परिस्थिती सह सतत होणाऱ्या रोग राई त्यातच सध्याच दर 900 रुपये कँरेट प्रणाने दर मिळाले पाहिजेत मात्र प्रत्येक्षात 300 ते 350 रुपये दर मिळत असून ते परवडत नसल्यामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील रामभाऊ केळे या शेतकऱ्यावर 3 एकर संत्रा बागेवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून जवळपास 9 ते 10 लाखांचं नुकसान झालं आहे.
सरकार नवीन बागा लावण्यासाठी रोजगार हमी योजनेतून लाखो रुपये अनुदान देते.मात्र 10 वर्षापासून मुलाबाळा प्रमाणे जोपासलेल्या बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असताना शासनाकडून कोणतीच मदत होत नसून शासनाने याकडे लक्ष देऊन संत्रा बागेला हमी दर ठरवून दिले तर बागा जोपासण्यात मदत होणार आहे