मतदारांना चोट्टे म्हणून संबोधणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा- गावाकऱ्यांनी दिले पोलीस स्टेशनला निवेदन.
मतदारासह संपूर्ण गावकऱ्यांना चोट्टे म्हणून संबोधल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात गावात तीव्र संतापाची लाढ.
नेहमी चर्चेत असणारी डोणगाव ग्रामपंचायत असते मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या संभाषणातून भ्रष्टाचाराचा सल्ला देण्या बाबतीत सुद्धा डोणगाव ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी मागे नसण्याचे जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर डोणगाव येथील ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांनी ग्रामस्थांना अपशब्द बोलल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तसेच विविध प्रसिद्धी माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाल्याने 1 सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन गावकऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
डोणगाव ग्राम पंचायत मधील वार्तालाप हा सिसिटीव्ही मध्ये कैद झाला व हा वार्तालापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे हे महिला सरपंच यांना सांगतात कि ताई तुम्हांला कोणीही फुकटात मतदान केले नाही सगळ्यां चोट्यानी पैसे घेऊन तुम्हाला मतदान केले, आपल्याला पैसे खाण्याचा अधिकार या ठिकाणी बहाल केलेला आहे. त्यामुळे आपण पैसे खाललेच पाहिजेत असे अनेक विधाने या व्हायरल व्हिडिओ मध्ये केलेले आहेत तसेच मतदार राजाला चोर संबोधने तसेच तुम्ही पैसे देऊन निवडून आलेत पैसे खाण्यासाठीच या ठिकाणी बसलो असे विधान म्हणजे लोकशाहीस काळिमा फसण्या सारखे आहे अश्या ग्राम विकास अधिकाऱ्यांस निलंबित करून त्यावर गुन्हे दाखल करा या आशयचे एक निवेदन गावकऱ्यांनी दिले त्यावर लिहिले आहे कि ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यांच्या संपतीची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली या निवेदनावर शेकडो सह्या आहेत.