छायाचित्र संग्रहित
उपसरपंचा दात पाडला तर सरपंच पित्याचा चावा घेतला, परस्परा विरुद्ध गुन्हे दाखल.
Buldhanaडोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम वरुड येथे 27 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीची मासिक मिटिंग चालू होती अश्यात सरपंच यांचे वडील ग्राम पंचायत मध्ये आले असता उपसरपंच यांनी मासिक मिटिंग सुरु असताना आत येऊ नका असे सांगून आत येण्यास मज्जाव केला असता ज्याने हाणामारी होऊन दोन्ही कडील लोक जखमी झाले तर परस्पर विरुद्ध दिलेल्या फिर्यादीने 8 लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
ग्राम वरुड मध्ये 27 सप्टेंबर रोजी ग्राम पंचायतची मासिक मिटिंग होती त्यात सर्व ग्राम पंचायत सदस्य व सरपंच बसलेले असताना उपसरपंच कुंडलिक भिका राठोड यांनी सरपंचांचे वडील महादेव माणिकराव वानखेडे यांना ग्राम पंचायत मध्ये येण्यास मज्जाव केला असता ज्याने त्यांना वाईट वाटले व त्यांनी गैर कायदा मंडळी जमा करून कुंडलिक राठोड यांना मारहाण केली ज्याने त्यांचा एक दात पडला तर डाव्या हातांच्या खाद्यावर चावा घेतला व त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी अतुल वानखेडे, गोपाल वानखेडे, महादेव वानखेडे, जगदीश पवार, श्रीचंद पवार यांच्या विरुद्ध विविध कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर सरपंचांचे वडील महादेव वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ग्राम पंचायत मधली मासिक मिटिंग संपल्या नंतर फिर्यादीचा मुलगा सरपंच हा ग्राम पंचायत मध्ये हजर असताना महादेव वानखेडे हे पोखरा समितीचे कृषि सहाय्यक व समूह सहाय्यक यांच्या सोबत ग्राम पंचायत मध्ये आले असता कुंडलिक राठोड उपसरपंच हे दारू पिऊन ग्राम पंचायत मध्ये बसलेले होते तेव्हा त्यांनी आमची मिटिंग सुरु आहे आत येऊ नका असे सांगून ग्राम पंचायत मध्ये येण्यास मज्जाव केला तेव्हा सरपंच मुलाने आत येऊद्या असे सांगितले या कारणा वरून झालेल्या वादात कुंडलिक राठोड याने फिर्यादीला चावा घेतला तर इतरांनी मला व माझ्या मुलाला लोटपोट करीत शिवीगाळ केली त्यावरून कुंडलिक राठोड, दिलीप राठोड, तुकाराम पवार यांच्या विरुद्ध विविध कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत