Buldhana,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्यावर कारवाईची मागणी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, June 1, 2023

Buldhana,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्यावर कारवाईची मागणी

 



 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय खी शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल 'इंडिक टेल्स' च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्यांचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे आपले संपूर्ण आयुष्य वेचल शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड थोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तीकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरश: इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.
तरी सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख 'लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने आज दिनांक एक 1/06/2023 रोजी ठाणेदार मेहकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे  यावेळी म.फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप पांडव, भिमशक्तीचे भाई कैलास सुखदाने, समता परिषदचे जी. सरचिटणीस अशोक इंगळे, प्रसिद्धी प्रमुख रफिक कुरेशी, कार्याध्यक्ष शिवा इंगळे, शहर अध्यक्ष प्रमोद सौभागे, प्रवीण काठोळे मा. सरपंच रत्नापुर, श्याम इंगळे उपसरपंच डोनगाव, रमेश इरतकर जवळा, योगेश सौभागे अध्यक्ष बालाजी अर्बन, केशव गीऱ्हे सर तालुका अध्यक्ष माळी समाज सेवा समिती, संतोष सोनुने मेहकर, गजानन पायघन अंजनी, दत्ता वानखेडे लोणी गवळी, जगदीश कानकटाव गोहगाव, सद्दाम कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस मेहकर, आश्रु मानवतकर मेहकर, नरेंद्र सोनुने आरेगाव, प्रकाश जागृत हिवरखेड, विठ्ठल पायघन दे. साकर्शा. सुखदेव इंगळे पिंप्री माळी, पवन गाभने दे. माळी. सह समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Top Ad

-->