निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार
बुलढाणा जिल्ह्यातील नागापूर येथील १५ वा वित्त आयोग मार्फत सुरु असलेल्या आमची चौकशी करून दोषींवर कारवाई करून संबधीत कामाचे देयके करू नये अशा याची तक्रार करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त नागापूर येथे जल जीवन मिशनचे पाणीपुरवठ्याचे काम सुरु आहे. यामधे ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून पाणीपुरवठा दुरुस्तीचे काम सुरु आहे. सदर काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचं झालले आहे. अंदाजपत्रकानुसार सदरचे काम झालेले नाही. नदीपात्रात कुठल्याही प्रकारचे आर.सी.सी. कॉलमच बांधकम न करता पाईपलाईन ही नदीपात्र खोदून त्यावर फक्त माती टाकण्यात आली आहे. सदर पाईपलाईन ही पहील्या पावसात वाहून जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन ही लिकेज आहे.
तसेच अं. पत्रकानुसार सदर पाईपलाईनची लांबी ही कमी करण्यात आलेली आहे. वरील सर्व प्रकारचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी व चौकशी होईपर्यंत सदर कामचे देयके अदा करण्यात येवु नये. करीता गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता ग्रामिण पाणीपुरवठा उपविभाग, मेहकर यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य, धन्यकुमार गंगाराम खिल्लारी, रुबीना परविन सैयद याकुब,देवानंद मोतीराम खोडके. यांनी तक्रार दाखल केली आहे.