मुंबई-: मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उद्योगविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे देशातील पहिल्या सुमारे १२ हजार ४८२ कोटीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.