मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती भीषण अपघात; दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.
(आपला विदर्भ मलकापूर प्रतिनिधी हिरा आसलकर)
मलकापूर मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वरती दोन ट्रॅव्हलचा समोरासमोर भिडून भीषण अपघात झाल्याचे घटना आज दिनांक 29 जुलै रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उडान पुलावरती घडली. या धडकेत पाच प्रवासांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती या ट्रॅव्हल्स मध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पो.नी. अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक यांच्या अधिकारी व कर्मचारी सहित घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. जखमींना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध नसल्याने माणुसकीचे दर्शन घडवत जखमींचा जीव वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पो.नी. एफ.सी. मिर्झा यांनी भेट दिली.